Bandhkam Kamgar :बांधकाम कामगारांना दिवाळीचा 5 हजार रुपये बोनस जाहीर लगेच पाहा संपूर्ण माहिती

Bandhkam Kamgar राज्यातील ५४ लाख ३८ हजार ५८५ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना येत्या दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक शंकर पुजारी यांनी दिली.

शंकर पुजारी म्हणाले, नोंदणीकृत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये बोनस हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकरामधून सुमारे २७१९ कोटी २९ लाख रुपये देण्यात येणार आहे. दिवाळीपुर्वी सर्व बांधकाम कामगारांना बोनस मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी ८ ऑक्टोबर २०२४ ला कृती समितीने आझाद मैदानात आंदोलन केले होते. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. बोनस देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्रधान सचिवांना दिली त्यावर निर्णय करू असे आश्वासन शिष्टमंडळाला सिंगल यांनी दिले होते.Bandhkam Kamgar

 

Bandhkam Kamgar तसेच महिन्यापूर्वी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बोनस देण्याचा निर्णय करावा, असे निवेदन दिले होते. याबाबतही विचार करू, असे आश्वासन कामगार मंत्री खाडे यांनी दिले होते. तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपये बोनस घोषित केला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी शासनाने केलेली नव्हती. न्यायालयीन प्रक्रियेनंतर तीन वर्षापुर्वी बांधकाम कामगारांना शासनाने बोनसबात निर्णय करावा, असा आदेश दिला होता.

बांधकाम कामगारांना रक्कम. ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य (सानुग्रह अनुदान) देण्याबाबत निर्णय करण्यात आला. १० ऑक्टोबर २०२४ अखेर मंडळामध्ये नोंदित (जिवित) असलेले २८ लाख ७३ हजार ५६८ तसेच मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी व नुतनीकरणाकरिता प्राप्त झालेल्या २५ लाख ६५ हजार १७ अशा एकुण ५४ लाख ३८ हजार ५८५ बांधकाम कामगारांना ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला.Bandhkam Kamgar 

Leave a Comment